आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील वन विभाग अंतर्गत येत असलेल्या उंबरदेव ते कुवरदेव व आंबाबरवा वन्यजीव अभयारण्य ह्या व्याघ्र बहुल जंगलाच्या शेजारी असलेला सातपुड्यातील वने सध्या वणव्यांनी धगधगत आहे. या वणव्यामुळे वन संपत्तीसह वन्य जीवांची हानी होत आहे. प्रकरणी वन कर्मचाऱ्यांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुवरदेव वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सागवानाची झाडे आहेत. या वनपरिक्षेत्रात १८ फेब्रुवारी रोजी आग लागली. परंतु वन कर्मचाऱ्यांनी या आगीकडे दुर्लक्ष केल्याने ही आग २८ फेब्रुवारी पर्यंत धगधगत होती. तसेच जिल्ह्यातील उंच शिखरांपैकी एक असलेले ढोरमाऱ्याच्या मागच्या बाजूला भिंगारा पश्चिम बीटमध्ये २७ फेब्रुवारी संध्याकाळ पासून वणवा धगधगत होता, या वणव्यामुळे अमूल्य वन संपत्ती व वन्यजीवांची ठेवा नष्ट झाला आहे. शिवाय या वणव्यामुळे वातावरणात प्रदूषण वाढत आहे.
वन विभागाचे दुर्लक्ष व वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात वणवा लागत असल्याचे दिसून येत आहे. या वणव्या बाबत वन विभागाशी संपर्क साधला असता बऱ्याचदा ही आग आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगीतले जाते. तर काही वेळा आम्ही वणवा विझवत असल्याची माहिती प्रभारी वनक्षेत्र अधिकारी यांनी दिली. मागील आठवड्यापासून दररोज रात्री सातपुड्याच्या विविध भागांत आग लागल्याचे दिसत आहे. वन गुन्हे पूर्णता रोखण्यासाठी पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची व वन विभागातील रिक्त पदे भरण्याची गरज आहे.
वन परिक्षेत्रात डिंक काढणाऱ्यांनी लावलेल्या आगीमुळे भडकलेला वणवा . डिंक काढण्यासाठी गुन्हेगार लावतात आगी वन परिक्षेत्रातील आगी या फेब्रुवारी महिन्यापासून दरवर्षी लागतात. परंतु यंदा आगीचे प्रमाण जास्तच वाढले आहे. या आगी काही गुन्हेगार डिंक काढण्यासाठी लावत असल्याचे उघडकीस येत आहे. सालई व इतर काही वृक्षांच्या बुडाशी कुऱ्हाडीचे घाव मारून त्या परिसराला आग लावल्या जाते. त्यामुळे त्या घावातून डिंक निघतो, असा गुन्हेगारांचा समज आहे. याच पद्धतीने परिसरातील कड व धावडा अशी गोंद उत्पादनासाठी महत्त्वाची झाडे या गुन्हेगारांनी नष्ट केल्याचे वृद्ध सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.