आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:दांडेकर नगरातील शनिवारची घटना; रविवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहीही कारण नसताना घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या चौघांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी मनपा कर्मचाऱ्यावर चॉपर व फायटरने हल्ला केला. शनिवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संजय प्रभाकर बागुल (वय ५२, रा. दांडेकरनगर, पिंप्राळा रोड) हे जखमी झाले.

संजय बागुल हे महानगरपालिकेत वाहनचालक म्हणून नोकरीला आहेत. शनिवारी रात्री नऊ वाजता ते घरात आई-वडिलांसोबत गप्पा मारत होते. या वेळी अंगणात उभ्या असलेल्या त्यांच्या कारवर चार तरुण जोरजोरात थापा मारून शिवीगाळ करत होते. बाहेर येऊन त्यांनी त्या तरुणांना हटकले. याचा राग आल्याने महेंद्र समाधान सपकाळे (रा. बुध्दनगर), उमाकांत वाघ (रा. मीराबाईनगर पिंप्राळा), राकेश मिलिंद जाधव (रा. मढी चौक, पिंप्राळा) आणि एक अनोळखी तरुण अशा चौघांनी त्यांच्यावर चॉपर व फायटरने वार केले.

लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घराच्या कुंपणात घुसून बागुल यांच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात बागुल हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्या एकाचा मोबाइल बागुल यांच्या कंपाउंडमध्ये पडला होता. हा मोबाइल त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी बागुल यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी नीलेश पाटील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...