आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली:कविता गायन, वक्तृत्त्व, संवाद, निबंध, चित्रकला‎ स्पर्धेतून उलगडला सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट‎

‎जळगाव7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

खेडी येथील सद्गुरू एज्युकेशन‎ सोसायटी : प्राथमिक विद्यामंदिरात‎ मुख्याध्यापिका गायत्री भंगाळे यांनी‎ माल्यार्पण केले. गणेश लोडते, भूषण‎ जोगी, लीलाधर नारखेडे यांनी‎ सावित्रीबाईंबाबत मार्गदर्शन केले. या‎ वेळी जावेद तडवी, सोपान पाटील, ज्योती‎ महाले, प्रमोद चौधरी उपस्थित होते.‎ शिल्पा झोपे यांनी सूत्रसंचालन केले. पूनम‎ चौधरी यांनी आभार मानले.‎

बहिणाबाई विद्यालय : बहिणाबाई‎ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात टी.‎ एस. चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या‎ प्रतिमेचे पूजन केले. प्रतिभा खडके यांनी‎ मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी स्वाती‎ कोल्हे, डॉ. प्रतिभा राणे, सीमा चौधरी,‎ अरुणा नेमाडे, नीलिमा काळे, संतोष‎ पाटील, विशाल पाटील, दिनेश चौधरी,‎ संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, जगदीश‎ नेहेते आदींनी सहकार्य केले. पी. पी.‎ चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. आर.‎ एस. वाणी यांनी आभार मानले.‎

रमाई फाउंडेशन : रमाई फाउंडेशनतर्फे‎ सावित्रीबाई फुले यांना अभिवादन‎ करण्यात आले. अध्यक्ष सचिन अहिरे,‎ आनंद महाजन, नरेंद्र सावळे, इमाम‎ पिंजारी, अमीन तडवी, महेश गायकवाड,‎ आकाश पाटील उपस्थित होते.‎ आरपीआय महिला आघाडी :‎ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात‎ गट) च्या महिला आघाडीतर्फे शहर‎ महिला अध्यक्षा छाया वाघ यांनी‎ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला‎ अभिवादन केले. शोभना भलेराव, दीपाली‎ गव्हाणे, अनिल चंद्रे, बळीराम हिरे,‎ विजय पाटील, जे. डी. भालेराव, युवक‎ अध्यक्ष अजिज शेख, प्रकाश सोनवणे,‎ दीपक बिऱ्हाडे, महेंद्र परदेशी, रईस‎ काकर, बापू बिऱ्हाडे, फिरोज पिंजारी, रमा‎ बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.‎

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल : येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या‎ प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाईंच्या भूमिका हेत्वी तळेले, दिव्या पाटील, सृष्टी पाटील यांनी साकारली होती.‎ या वेळी ज्येष्ठ शिक्षिका एस. बी. रत्नपारखे, विद्यार्थीनिनी सोनल सावकारे, श्रुती कोष्टी यांनी मनाेगत व्यक्त केले. या‎ वेळी मुख्याध्यापक सी. बी. अहिरे, बी. आर. खंडारे उपस्थित होते. तसेच न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात‎ प्रतिमेचे पूजन दिव्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी मुख्याध्यापक प्रविण महाजन उपस्थित होते.‎

उर्दू गर्ल्स हायस्कूल : के.‎ के.‌ उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर‎ कॉलेजमध्ये ‘चर्चा विद्यार्थिनींशी'‎ हा तन्वीर जहा शेख यांच्या‎ मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात‎ आला. या वेळी मुख्याध्यापक‎ अकील खान ब्यावली जाकीर शाह,‎ नाजिया शेख, मझरोद्दीन शेख,‎ समीना शेख, मोहसीन शाह, अस्मा‎ शेख उपस्थित होते. कार्यक्रमासाठी‎ सांस्कृतिक विभागाचे मझरोद्दीन‎ शेख, तबरेज शेख व इतर शिक्षकांनी‎ सहकार्य केले.‎

खुबचंद सागरमल विद्यालय : खुबचंद‎ सागरमल विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या‎ पुण्यतिथीनिमित्ताने मुख्याध्यापक सतीश साळुंखे यांनी‎ प्रतिमापूजन केले. या वेळी सुरेश आदिवाल, लक्ष्मीकांत‎ महाजन, अजय पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील,‎ सुलेमान तडवी उपस्थित होते.‎

येथे झाले कार्यक्रम : श्रीराम‎ माध्यमिक विद्यालय, मानव सेवा‎ विद्यालय, प्रोग्रेसिव्ह स्कूल, संस्कृती‎ माध्यमिक विद्यालय, गोदावरी‎ फाउंडेशन, कमल राजाराम वाणी‎

क्रीडा रसिक विद्यालय : क्रीडा रसिक‎ सोसायटी संचालित प्राथमिक विद्यालयात‎ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका‎ रत्ना मालपुरे यांनी माल्यार्पण केले. चेतना महाजन,‎ सायली डोळे, सुनीता सीमाले उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...