आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापेमारी:दूध संघातील घोटाळा ; दिवसभर छापेमारी, हाती काहीच नाही

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूध संघातून १ ऑगस्टपासून सुमारे ३,३६० किलो तूप बेकायदेशीरपणे विक्री झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी तशी माहिती न्यायालयात दिली आहे. परंतु, या तूप विक्रीचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती अद्याप लागले नाहीत. रविवारी दिवसभर पोलिसांच्या दोन पथकांनी यासंदर्भात शहरात विविध ठिकाणी छापेमारी केली.

सहा संशयिताना ताब्यात घेतल्यानंतर आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. अधिक पुराव्यांसाठी दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यातील रविवारी पोलिसांनी तूप विक्रीचे पुरावे मिळवण्यासाठी छापेमारी केली. संशयितांनी वेगवेगळ्या ठिकाणी तुपाची विल्हेवाट लावली आहे. तुपाचे रिकामे डबे शोधण्यासाठी भंगार दुकानांवरही पोलिसांनी चौकशी केली आहे. अटकेतील संशयित पोलिसांनी तपासात सहकार्य करीत नाही. समाधानकारक उत्तरे देत नाहीत. त्यामुळेच अधिक पुरावे मिळण्यास अडचण येत असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगीतले.

नेहतेने भरले दोन लाख रुपये
एमडी मनोज लिमये, सी. एम. पाटील यांच्यासह सहा संशयितानां पाेलिसांनी अटक केली आहे. तत्पूर्वी मुख्य संशयित निखील सुरेश नेहते याने अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यासाठी अपहार झालेली सुमारे दोन लाख रुपये रक्कम त्यांनी न्यायालयात जमा केली आहे. इतर सहसंशयितांना न्यायालयीन कोठडी मिळावी यासाठी बचावपक्षाच्या वकीलांनी शनिवारी हा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. या प्रकरणात पुढील काळात आणखी काय माहिती समोर येते, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

आज सर्वांना न्यायालयात पुन्हा हजर करणार
अटकेतील सहा संशयितांची दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सोमवारी संपणार आहे. त्यामुळे सोमवारी सर्वांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...