आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने बजावली मक्तेदाराला नाेटीस:शहरातील स्मशानभूमीमध्ये लाकूड, गाेवऱ्यांचा तुटवडा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रत्येक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार संदर्भात अपेक्षित असलेली माहिती जाहीर करणे अपेक्षित असताना फलक लावलेला नाही. चारही स्मशानभूमीत लाकूड व गाेवऱ्यांचा साठा उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याने मक्ता रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार सुरेश भाेळे यांनीही तक्रार केल्यानंतर मक्तेदाराला अंतिम नाेटीस बजावण्यात आली आहे.

मनपा क्षेत्रातील नेरीनाका, शिवाजीनगर, पिंप्राळा व मेहरूण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रति मृतदेहासाठी आठ मण लाकूड व ५० गाेवऱ्या मिळून ९०० रुपये आकारले जातात. त्यासाठी प्रल्हाद काेळी यांना मक्ता देण्यात आला हाेता. नाेव्हेंबर २०२३पर्यंत मक्तेदाराची मुदत हाेती. दरम्यान मक्तेदाराने प्रत्येक स्मशानभूमीत परवाना अटी व शर्तीनुसार मक्तेदाराचे नाव, संपर्क क्रमांक, आराेग्य निरीक्षकाचे नाव, मंजूर दराचे बॅनर लावणे बंधनकारक आहे. पण तसे झालेले नाही. अंत्यसंस्कारासाठी लाकूड व गाेवऱ्यांचा पुरेसा पुरवठा नाही. या संदर्भात आमदार भाेळेंनी तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन सहायक आयुक्त उदय पाटील यांनी मक्तेदाराला अंतिम नाेटीस बजावली असून, परवाना रद्द करण्याचा व काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...