आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 19 रोजी होणार ; 499 केंद्रांवर ही परीक्षा

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १९ जुनला हाेणार आहे. या परीक्षेस राज्यातील एकूण ९ हजार २३६ शाळांसह १ लाख ३० हजार ९४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ४९९ केंद्रांवर ही परीक्षा होईल. शाळांना www.mscepune.in व https://nmmsce.in या संकेतस्थळावर ८ जूनपासून हॉलतिकिटे मिळण्यास सुरवात झाली आहे. ते विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल. काही अडचण आल्यास संबंधित परीक्षा केंद्र संचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील केंद्रांवरही ही परीक्षा हाेणार आहे. या अनुषंगाने शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीटे काढून दिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...