आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:आधार अपलोड नसलेल्या 44 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती येणार धोक्यात ; शिक्षक ठरू शकतात अतिरिक्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये जिल्ह्याभरातील ४४ हजार विद्यार्थ्यांनी आधारकार्ड अपलोड केलेले नसून आधारकार्ड अपडेट असलेली संख्याच पटसंख्या म्हणून गृहित धरली जाणार आहे. तर दुसरीकडे १८ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड डुप्लिकेट आढळून आले असून विद्यार्थी बोगस आढळल्यास शिक्षक अतिरिक्त होतील. परिणामी त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे लागेल. किंबहुना, या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीलाही भविष्यात मुकावे लागणार. जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीचे ८ लाख ४० हजार ५७७ विद्यार्थी आहे. त्यापैकी ७ लाख ९६ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी आधारकार्ड अपलोड केले आहे. ४४ हजार विद्यार्थ्यांनी अजूनही आपले आधार सरल पोर्टलवर अपलोड केलेले नाही. दरम्यान, आधार नोंदणी झाल्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात आली होती. त्यात जळगाव जिल्ह्यात १८ हजार ९३ विद्यार्थी डुप्लिकेट आढळून आले आहे. हे चित्र समोर आल्यानंतर पडताळणी करून ती दुबार नोंद जनरल रजिस्टर व स्टुडंट पोर्टलमधून रद्द करण्याच्या सूचना.

बातम्या आणखी आहेत...