आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती‎ योजना:दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती; अर्ज मागवले‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय व अधिकारिता‎ मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली‎ यांची दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी‎ टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती‎ योजना लागू करण्यात आली आहे.‎ शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी‎ महाराष्ट्रातून ३१ विद्यार्थ्यांची निवड‎ करण्यात येणार आहे. या‎ योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती‎ सोबतच देखभाल, परीक्षण भत्ता,‎ विशेष भत्ता, साहित्य खरेदीसाठी‎ रक्कम देण्यात येणार आहे.‎ दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग‎ यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च‎ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही‎ टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती‎ योजना देण्यात येते.

या योजनेकरिता‎ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६‎ लाखांपर्यंत व दिव्यंगत्वाचे प्रमाण‎ ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक‎ असावे, असे निश्चित करण्यात‎ आले आहे. या योजनेंतर्गत‎ राज्यासाठी केंद्र शासनाकडून ३१‎ विद्यार्थ्यांचा संच मान्य झाला आहे.‎ शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये‎ शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र‎ विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी तसेच‎ शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता‎ योजनेच्या लाभासाठी प्रवेशित‎ विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज NSP‎ पोर्टलवर ३१ ऑक्टोबरपर्यंत‎ ऑनलाइन भरले आहेत. आता‎ छाननी होऊन १५ रोजी अर्ज‎ निकाली निघणार आहेत. दिव्यांग‎ विद्यार्थ्यांनी या याेजनेचा लाभ‎ घ्यावा यासाठी जनजागृतीही‎ संबंधित विभागातर्फे हाेत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...