आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आधार अपलोड नसलेल्या 44 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात, ‘सरल’ प्रणालीच्या पडताळणीतील वस्तुस्थिती

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये जिल्ह्याभरातील ४४ हजार विद्यार्थ्यांनी आधारकार्ड अपलोड केलेले नसून आधारकार्ड अपडेट असलेली संख्याच पटसंख्या म्हणून गृहित धरली जाणार आहे. तर दुसरीकडे १८ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड डुप्लिकेट आढळून आले असून विद्यार्थी बोगस आढळल्यास शिक्षक अतिरिक्त होतील. परिणामी त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे लागेल. किंबहुना, या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीलाही भविष्यात मुकावे लागणार. जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीचे ८ लाख ४० हजार ५७७ विद्यार्थी आहे. त्यापैकी ७ लाख ९६ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी आधारकार्ड अपलोड केले आहे. ४४ हजार विद्यार्थ्यांनी अजूनही आपले आधार सरल पोर्टलवर अपलोड केलेले नाही. दरम्यान, आधार नोंदणी झाल्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात आली होती. त्यात जळगाव जिल्ह्यात १८ हजार ९३ विद्यार्थी डुप्लिकेट आढळून आले आहे. हे चित्र समोर आल्यानंतर पडताळणी करून ती दुबार नोंद जनरल रजिस्टर व स्टुडंट पोर्टलमधून रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान डुप्लिकेट विद्यार्थ्यांची नोंद दोन शाळांमध्ये दिसत होती.

अमळनेरला चार हजार डुप्लिकेट पडताळणी केल्यानंतर १८ हजार ९३ विद्यार्थी डुप्लिकेट आढळले होते. त्यात सर्वाधिक ४ हजार २५१ डुप्लिकेट विद्यार्थी अमळनेर तालुक्यात आढळले होते. आता ४ हजार २४५ डुप्लिकेट नावे वगळण्यात आली असून. केवळ ६ विद्यार्थ्यांची नावे दुबार असल्याचे पोर्टलवर दिसत आहे. ४४ हजार विद्यार्थ्यांचे अपलोड नाही जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या ७ लाख ९६ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सरल पोर्टलवर आधारकार्डची नोंदणी केली आहे. दुसरीकडे ४४ हजार विद्यार्थ्यांनी अजून आधारकार्ड अपलोड केलेले नाही. अशा विद्यार्थ्यांना आधारकार्ड अपलोड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अनेक विद्यार्थ्यांचे आधार सरल प्रणालीवर अपडेट झालेले नाही. सरल प्रणालीवरील आधारच्या नोंदी पाहूनच शाळांची पटसंख्या निश्चित केली जाते. असे असले तरी अनेक विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही. त्यामुळे शाळांमधील पटसंख्या कमी दिसून शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...