आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:बनावट कागदपत्रांद्वारे दोन जणांनी लाटली साडेपाच लाखांची शिष्यवृत्ती ; दोघांवर गुन्हा

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट कागदपत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांची साडेपाच लाखांची शिष्यवृत्ती दोघांनी लाटल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यात न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खान्देश बहुद्देशीय संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी हे बांभोरी येथे आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्राचार्य या तिघांच्या नावाने संस्थेचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यात शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे टाकले जातात. संस्थाध्यक्षा यांचे पती रतीलाल वना पाटील (आर.व्ही पाटील, रा. शिव कॉलनी) व उपाध्यक्षा यांचे पती विलास दत्तात्रय नायर (रा. प्रभुदेसाई नगर) या दोघांनी १२ मे २०१८ ते २४ जून २०२१ या कालावधीत बँक व्यवहारात कोणालाही विश्वासात न घेता स्वाक्षरी बदलण्याची प्रक्रिया केली. यानंतर बनावट ठराव करून खोटे कागदपत्र जोडून प्राचार्य सचिन भीमराव पाटील यांच्या स्वाक्षरीचा अधिकार काढून घेतला. बँकेत नवीन स्वाक्षरी कार्ड न घेता जुन्या कार्डवरच व्हाइस प्रेसिडेंट असा शिक्का मारून घेतला. बँक अधिकाऱ्यांची दिशाभूल करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे वेळोवेळी ५ लाख ६१ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्राचार्य सचिन पाटील यांनी गुरुवारी धरणगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रतीलाल पाटील व विलास नायर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...