आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:शाळा सज्ज; आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष होणार सुरू

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शाळांना सोमवारपासून सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात बुधवारपासून शासनाच्या आदेशानुसार नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ ला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. बुधवारपासून जिल्ह्यातील ३४०५ शाळेत विद्यार्थी येणार असल्याने त्यांना शाळांमध्ये प्रसन्न वाटावे याकरिता मंगळवारी शिक्षकांनी फुगे, पताका लावून वर्ग सजावट केली. तसेच फळ्यावर शुभेच्छा व स्वागताचे संदेश लिहिण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटपदेखील करण्यात येणार आहे.

मनपा व जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक शाळांमध्ये प्रवेशोत्सव, शाळा पूर्वतयारी करण्यात आली आहे. मुलांचे जंगी स्वागत करावे यासाठी काही शाळांनी गुलाबपुष्पही मागवले आहे. शिक्षकांनी शाळेची स्वच्छता केली असून, बुधवारी पुस्तक वाटप केले जाणार असल्याने पुस्तकांवर शाळेचे शिक्के मारण्याचे काम झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...