आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या परीक्षेसाठी पाचवी व आठवीचे मिळुन 31 हजार 184 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, यंदा त्यात तब्बल नऊ हजार विद्यार्थ्यांची भर पडली असून पाचवीसाठी 19 हजार 729 तर आठवीसाठी 11 हजार 455 असे एकूण 31 हजार 184 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.
कोविडच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेले. तर बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेची माहिती पोहोचू शकली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र प्रथमच कोविडनंतर पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारीत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेतली जाते. 12 फेब्रुवारी 2023 ला परीक्षा होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाचवीच्या परीक्षेसाठी सात हजारांनी विद्यार्थी संख्या वाढली आहेत. तर आठवीच्या परीक्षेसाठी अडीच हजार विद्यार्थी संख्या वाढली.
शिष्यवृत्तीच्या पाचवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सहावी ते आठवीपर्यंत दरवर्षी 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर इयत्ता आठवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत वार्षिक 1500 रुपये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिले जातात.
जिल्हा परिषदेने सेस फंडातून भरली फी
जिल्ह्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षेला शंभर टक्के विद्यार्थ्यांनी बसले पाहिजेत, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे यासाठी गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या फीसाठी जिल्हा परिषद सेसमधून 15 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
जे विद्यार्थी मुदतीत अर्ज भरणार नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्हा परिषदेतर्फे भरण्यात आली आहे. या फंडातून किती रक्कम खर्च झाली याची माहिती १५ जानेवारी राजी उपलब्ध होणार आहे.
अंतिम निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
परीक्षा परिषदेतर्फे गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. या परीक्षेस पाचवीचे 23.90 टक्के तर आठवीचे 12.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अंतरिम निकालानंतर गुणपडताळणीची मुदतही संपली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आता अंतिम निकाल व गुणवत्ता यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.