आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रिया:जिल्ह्यातील शाळा संच मान्यता‎ ‘आधार’ पडताळणीद्वारे हाेणार‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील‎ शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया अद्यापही‎ बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू केली जाते आहे; परंतु त्यासाठी आता आधार सक्ती केली‎ असल्याने आधार व्हेरिफिकेशनच्या आधारे‎ शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली‎ जाईल. अन्यथा, संच मान्यता हाेणार नाही.‎ सर्व शाळांना दरवर्षी संच मान्यता करून‎ घेणे अनिवार्य आहे. शाळांमध्ये असणाऱ्या‎ विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक संख्या‎ आणि त्यांचे वेतन ही प्रक्रिया संच मान्यतेच्या‎ आधारे केली जाते. संच मान्यता नसेल तर‎ शिक्षकांच्या वेतनात अडचणी येतात.

दरवर्षी‎ शाळा सुरू होताना जून ते एप्रिल महिन्यातील‎ वर्गानुसार विद्यार्थी संख्या मोजली जाते. ३०‎ सप्टेंबरपर्यंत असलेली शाळेतील विद्यार्थी‎ पटसंख्या निश्चित केली जाते. विद्यार्थी संख्या‎ किती आहे? त्यानुसार शिक्षकांची संख्या‎ ठरवली जाते. जर शिक्षकांची संख्या विद्यार्थी‎ संख्येच्या तुलनेत अधिक असेल तर शिक्षक‎ अतिरिक्त ठरतो आणि विद्यार्थी संख्या जास्त‎ असेल तर पद भरतीसाठी मान्यता देण्यात येते.‎ ही प्रक्रिया शाळांनी दरवर्षी करणे अपेक्षित‎ आहे. ही सर्व प्रक्रिया सरल पाेर्टलद्वारे हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...