आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Jalgaon
 • Science And Technology Drama Compatation | Drama To Be Performed By Students For Human Welfare; Students From 6th To 10th Standard Can Participate

विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा:मानव कल्याणासाठी विद्यार्थी सादर करणार नाटक; 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना नोंदविता येणार सहभाग

जळगाव3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

राष्ट्रीय संग्रहालय परिषद (भारत सरकार), नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 मध्ये विज्ञान नाट्योत्सव विविध स्तरावर आयोजित करण्यात येणार असून यात इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे.

तालुका, जिल्हा व नंतर राज्यस्तरावर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान स्पर्धा घेण्याचे नियोजित आहे.

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव-2022 या नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई यांचेकडून मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झाले असून यात जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांना सहभागी होता येणार आहे. जिल्हास्तरावरील विज्ञान नाटयस्पर्धेची जबाबदारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विज्ञान पर्यवेक्षक / क्षेत्रीय अधिकारी पार पाडणार आहे. प्रत्येक जिल्हयात तालुकास्तरावर सुध्दा विज्ञान नाटयोत्सव घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्हयातून विभाग स्तरासाठी दोन विज्ञान नाट्य चमू निवडण्यात येणार आहे. विभागस्तरावरुन प्रथम क्रमांक आलेल्या केवळ एका विज्ञान नाट्य चमूला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेता येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे.

हे आहेत स्पर्धेचे नियम व अटी

 • शासनमान्य शाळेत नियमित शिकणारे (इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत) विद्यार्थी.
 • विज्ञान नाट्य पूर्ण करण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ
 • विज्ञान नाट्य हे हिंदी, मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर शासन मान्य भाषेतून सादर करता येईल.
 • विज्ञान नाट्याच्या एका चमूत जास्तीत जास्त 8 पात्र विद्यार्थी सहभागी होवू शकतात
 • विज्ञान नाट्याच्या दर्जेदार सादरीकरणाकरिता पोस्टर्स, बॅनर्स, दृकश्रवण माध्यमे आदींचा वापर करणे अपेक्षित आहे.

चार विषयांत सादरीकरण

नाट्योत्सवासाठी विद्यार्थ्यांना मानव कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित विषय देण्यात आले असून या लसीकरणाची कथा, महामारी, सामाजिक व वैज्ञानिक समस्या, जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचे नवकल्पन/संशोधन व मुलभूत विज्ञान व शाश्वत विकास हे चार विषय आहेत.

बातम्या आणखी आहेत...