आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वैज्ञानिक उपक्रम ग्रामीण शाळांपर्यंत पाेहाेचवा ; राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, कार्यशाळेचा सूर

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक गुणांना वाव मिळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्यात विज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, विज्ञान नाट्यमहोत्सव, विज्ञान मेळावा व अन्य उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमात विद्यार्थी सहभागी झाल्याने वैज्ञानिक संकल्पनेला चालना मिळते. ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे असा सूर कार्यशाळेत निघाला.

जळगावात प्रताप नगरातील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय राष्ट्रीय बालविज्ञान परिषद व इन्स्पायर अवॉर्ड कार्यशाळा घेण्यात आली. त्यात विज्ञान पर्यवेक्षक तथा उपशिक्षणाधिकारी इजाज शेख यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे गव्हर्निंग बॉडी मेंबर किशोर राजे, जिल्हा समन्वय सुनील वानखेडे, शैक्षणिक जिल्हा समन्वयक संदीप पाटील व तालुका समन्वयक उपस्थित होते. जिल्हास्तरावरून ग्रामीणपर्यंत विज्ञानाचे उपक्रम पोहाेचवण्यासाठी तालुका समन्वयकांची नियुक्ती करावी. तालुकास्तरावर प्रत्येक शाळेतील एक विज्ञान शिक्षकाची शाळा समन्वयक म्हणून नियुक्ती करून कार्यशाळा घेण्याचे सूचित करण्यात आले. जिल्हा व तालुका समन्वयांची निवड या कार्यशाळेत जाहीर करण्यात आली. सूत्रसंचालन रियाज शहा यांनी तर आभार निरंजन पेंढारे यांनी मानले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक वाढीस लागावा, त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना मिळावी, यासाठी शाळांमध्ये वैज्ञानिक उपकरणांचा वापर, सहजसोप्या शब्दात वैज्ञानिक संकल्पनांची उकल, वैज्ञानिक प्रात्यक्षिके, वैज्ञानिक उपकरणाचा वापर, असे उपक्रम शाळांमध्ये राबवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...