आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:समुद्राच्या पाण्याने खारवट होणाऱ्या जमिनीस सुपीक बनवण्याचे शास्त्रज्ञ महाजन यांचे संशाेधन इटली प्रथम

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटली येथे व्हर्च्युअल पद्धतीने अन्न आणि कृषी संस्था, रोमद्वारे परिसंवाद झाला. यात भडगाव येथील युवा वैज्ञानिक डाॅ. गोपाल रामदास महाजन यांनी समुद्राच्या खराब पाण्यामुळे खारवट, चोपण होणाऱ्या जमिनी पुन्हा एकदा लागवडीस योग्य कशा बनवता येतील, त्या जमिनींपासून अधिकाधिक उत्पन्न कसे काढता येईल व जमिनीचा कस (सामू) कसा वाढवता येताे याबाबत सादर केलेल्या संवादाला प्रथम क्रमांक देण्यात आला.

भडगाव येथील रहिवासी तथा कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थीं व युवा वैज्ञानिक डाॅ. गोपाल रामदास महाजन हे गोव्यात कार्यरत असून ते नऊ महिन्यांकरिता संशोधन कार्यासाठी अमेरिकेतील रिव्हर साइड या ठिकाणी गेले आहेत. इटली येथे फूड अॅड अॅग्रीकल्चरल आॅर्गनायझेशन (एफएओ) रोम येथे परिसंवाद आयाेजित करण्यात आला हाेता. यात त्याच्याह ५० पेक्षा अधिक देशातील शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला. यात पोषणासाठी माती (साॅईल फाॅर न्यूट्रिशन) या जागतिक परिसंवादात डाॅ.महाजन यांनी ८ हजार ३०६ आॅनलाइन मतांनी प्रथम स्थान मिळवले. परिसंवादात महाराष्ट्रातील एकमेव शास्त्रज्ञ डाॅ.गोपाल महाजन यांचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...