आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळ्यात जळगाव जिल्ह्याचे तापमान ४० अंशांवर जाते. अशात दुचाकीधारकांना सीट गरम होण्याची समस्या भेडसावत असते. त्यावर उपाय म्हणून रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘मूव्हेबल टू व्हीलर सीटकव्हर’चे संशोधन केले आहे. अवघ्या ६०० रुपयांत घरबसल्या हे सीटकव्हर तयार करता येणार आहे. या संशाेधनाला पेटंटही मिळाले आहे.
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिक विभागातील तुषार सपकाळे, दर्शना राणे, तोशिता राणे, अदिती शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रा. बिपाशा पात्रा, प्रा. मधुर चौहान यांच्या मार्गदर्शनात ‘मूव्हेबल टू व्हीलर सीटकव्हर’ तयार केले आहे. भविष्यात सामान्य जनतेसाठी हा शोध महत्त्वपूर्ण ठरणार असून, ऑटोमोबाइल क्षेत्रात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगीतले.
विद्यार्थी समाधानी : संशोधनाला पेटंट मिळाले त्यामुळे संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी समाधान मानले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हा विषय पूर्णत्वास नेला. ६०० रुपये खर्च करून कुणालाही घरबसल्या ‘मूव्हेबल टु व्हीलर सीटकव्हर’ बनवता येणार आहे.
अशी आहे बनवण्याची साेपी पद्धत
दुचाकीच्या सीटवर पुढे व मागच्या बाजूस दोन हूक लावले आहे. उन्हाळ्यात या हूकच्या सहाय्याने सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम सुतावर कार्बन नॅनोट्यूबचे कोटिंग केलेले एक जाड कापड लावले आहे. हे कापड उन्हापासून सीटचे संरक्षण करते. सीटच्या मापा एवढाच हा कापड सीटवर आच्छादला जाईल व दुचाकी मालक पुन्हा आल्यावर तो हा कापड पुन्हा सीटवरून काढून सीटच्या मागील बाजूस बसवलेल्या छोट्याश्या बॅगेत लॉक करेल. इतकी सहज शक्य व मध्यमवर्गीयांना परवडेल अशी ही पद्धत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.