आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RTE प्रवेश:जळगावमध्ये 165 जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर; विद्यार्थ्यांना 21 जूनपर्यंत प्रवेशाची मुदत

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत शिक्षणाचा अधिकार अर्थात आरटीई या योजनेनुसार 25 टक्के प्रवेश अंतर्गत 2022-2023 वर्षांकरिता मंगळवारी 165 जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना 21 जून पर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता सन 2022-23 च्या शैक्षणिक वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यात एकूण 594 विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर झालेली आहे. त्यापैकी शेवटच्या दिवसापर्यंत 372 प्रवेश निश्चित झाले आहे. दरम्यान 222 जागा रिक्त राहिल्या आहे. यापैकी 165 जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे.

यंदा जळगाव जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार पहिली निवड यादी 2940 विद्यार्थ्यांची जाहीर झाली होती. राज्यभरात 15 जूनपासून शाळा सुरु होत असताना आरटीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याने विद्यार्थी कधी प्रवेश निश्चित करून शाळेत जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान पहिल्या निवड यादीतील 2940 पैकी 2173 विद्यार्थ्यांनीच मुदतीअंती प्रवेश निश्चिती झाले तर पहिल्या निवड यादीतील 372 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...