आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठराव मंजूर:माध्यमिक शिक्षक पतपेढी सभासदांचा २५ लाखांचा अपघाती विमा काढणार

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर नाेकर पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. त्यात सभासदांचा २५ लाखांचा अपघाती विमा काढणे, मृताच्या कुटुंबियांना दाेन लाख तर कर्जमुक्तीचे दीड लाख असे अडीच लाखांचे अर्थसाहाय्य देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

नूतन मराठा महाविद्यालयात रविवारी ही सभा झाली. पतसंस्थेचे अध्यक्ष एस. डी. भिरूड अध्यक्षस्थानी होते. संस्थेचा अनावश्यक खर्च, संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून झालेला गैरव्यवहार, अनावश्य खर्च याविषयी डॉ. मिलींद बागूल यांनी प्रश्न मांडला. विनोद महिर्षी, मनोजपाटील यांनी कर्मचारी नियुक्ती, पगार या विषयावर आक्षेप घेतले. अल्पोहार व चहापानासाठी दिलेल्या १२०० रुपयांच्या भत्त्याचा लाभ १० हजार २६ सभासदांनी घेतला. या वेळी सभासदांची माेठी उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...