आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार:विद्यापीठातील पाच जणांची कंपनीत निवड; केंद्रीय प्रशिक्षण, नियुक्ती कक्षाचे आयाेजन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाद्वारा आयोजित मुलाखतींद्वारे पाच विद्यार्थ्यांची कंपनीत निवड करण्यात आली आहे.विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाद्वारा विविध कंपन्यांच्या परिसर मुलाखतींचे आयोजन करून विद्यार्थ्यांना रोजगाराची सुविधा निर्माण करून देण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या बी. टेक. केमिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन मुलाखतींमध्‍ये विवेक कोल्हे आणि रेणुका माळी या दोन विद्यार्थ्यांची पुणे येथील गेक्सॉन इंडिया प्रा. लि. या कंपनीत निवड करण्यात आली आहे.

तसेच एमएस्सी फिजिक्स, ऑरगॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात प्रत्यक्ष मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. या मुलाखतींमधून एम.एस्सी फिजिक्सचा विशाल परशुराम, एम.एस्सी. इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचा अजय भावसार आणि एम.एस्सी. पॉलिमर केमिस्ट्रीचा प्रमोद गुरेल या तीन विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथील गरवारे हायटेक फिल्मस् कंपनीत निवड झाली आहे. मुलाखतीसाठी सोनाली दायमा, प्रा. अमरदीप पाटील, प्रा. विकास गीते यांनी व्यवस्थापन केले.

बातम्या आणखी आहेत...