आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना रोजगाराची सुविधा:विद्यापीठातील चाैघांची मुंबईच्या कंपनीत निवड

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षातर्फे आयोजित मुलाखतींतून एम.एस्सीच्या चार विद्यार्थ्यांची मुंबई येथील युपीएल लिमिटेड कंपनीत निवड झाली.

विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाद्वारा विविध कंपन्यांच्या परिसर मुलाखतींचे आयोजन करून विद्यार्थ्यांना रोजगाराची सुविधा निर्माण करून देण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित मुलाखतींमध्ये स्कूल ऑफ केमिकल सायन्सेच्या एम.एस्सी पेस्टिसाइडस् ॲण्ड ॲग्रोकेमिकल्सचे विश्वजीत चौधरी, नरेंद्र महाजन, नितेश राठोड आणि एम.एस्सी. ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा सागर सोनवणे या चाैघांची यूपीएल लिमिटेड कंपनीत निवड करण्यात आली आहे.

संधीचे द्वार खुणावतेय
परिसर मुलाखती आयोजनासाठी प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा, प्रा. अमरदीप पाटील, प्रा. रत्नमाला बेंद्रे यांनी व्यवस्थापन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठ संधी उपलब्ध करून देत असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...