आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन‎:केशवस्मृतीतर्फे स्वयंराेजगाराचे धडे‎

जळगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित‎ सेवावस्ती विभागातर्फे हरिविठ्ठल‎ नगरातील सेवावस्तीत रोजगार‎ निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.‎ प्रथम सत्रात महिलांसाठी फिनाइल,‎ लिक्वीड सोप, साबण, नीळ‎बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.‎

सहकार भारतीचे लक्ष्मण पात्रा‎ (ओडिशा) यांनी ते दिले.‎ दुसऱ्या सत्रात महिला व किशोरी‎ मुलींसाठी मासिक पाळी संदर्भात‎ रोटरी सेंटरच्या डॉ. वैशाली जैन,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ डॉ. प्रणिता वडोदकर यांनी‎ मार्गदर्शन केले. आहाराविषयी डॉ.‎ विद्या चौधरी यांनी माहिती दिली.‎ मुली व महिलांना रोटरी सेंटरतर्फे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सॅनिटरी पॅड देण्यात आले.‎ सहप्रकल्प प्रमुख मनीषा खडके,‎ सहकार भारतीच्या शहरप्रमुख‎ अनिता वाणी आदी उपस्थित हाेत्या.‎

बातम्या आणखी आहेत...