आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थापाड्यांचा सुळसुळाट:जळगावमध्ये डमी ग्राहक पाठवून पकडले 62 हजारांचे बोगस बियाणे, शेतकऱ्यांत खळबळ

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा तोंडावर आलेला असल्याचे सर्वत्र शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. अशात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. अमळनेर तालुक्यातील कळंबू गावात एचटीबीटी कापसाच्या बियाण्याची विक्री करीत असलेल्या एका विक्रेत्यावर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून 62 हजार रुपयांचे बोगस बियाणे जप्त केले आहे.

राजेंद्र धोंडूसिंह राजपूत (वय 46, रा. कळंबु, ता. अमळनेर) या विक्रेत्यासह संबधित उत्पादक कंपनी, मालक, वाहतूकदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपूत हे बोगस बियाणे विक्री करीत असल्याची तक्रार गुण नियंत्रक निरीक्षक (बियाणे, रासायनिक खते व किटकानाशके) अरुण श्रीराम तायडे यांच्याकडे आली होती. त्यानुसार तायडे यांनी गुरुवारी डमी ग्राहक तयार करुन राजपूत यांच्या दुकानात पाठवला.

दुकानात बोगस बियाणे असल्याची खात्री होताच पथकाने छापा मारून सर्व माल जप्त केला. या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक भरत ईशी तपास करीत आहेत. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच शिरसोली येथुनही 94 हजार रुपयांचे बोगस बियाणे याच पथकाने जप्त केले आहे. यामुळे जिह्यात खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...