आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइमनगरी:रिक्षा चालकाकडून ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण; जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भास्कर मार्केटजवळील खडके हॉस्पिटलजवळ रिक्षाचालकाकडून ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी 4 वाजता घडली. जखमी झालेल्या वृध्दास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

किरकोळ कारणावरून वाद

राजाराम कृष्णा पाटील (वय-60) असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी सकाळी 10 वाजता ते जळगावातील भास्कर मार्केट येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी खडके हॉस्पिटल येथे आले होते. दरम्यान, नातेवाईकांना भेटल्यानंतर घरी जाण्यासाठी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास हॉस्पीटलसमोर उभ्या असलेल्या रिक्षाजवळ आले. त्यावेळी प्रवाशांवरून एका रिक्षा चालकासोबत त्यांचा वाद झाला.

कोणतीच कारवाई नाही

रिक्षाचालकाने कृष्णा पाटील बुक्क्यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर रिक्षा चालकाने त्यांना रस्त्यावर खाली ढकलून दिले. तसेच रिक्षाचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. तिथे असलेल्या तरुणांनी पाटील यांना खागसी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...