आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोपडा:ज्येष्ठ समीक्षक डॉ.रवींद्र भास्करराव पाटील यांचे कोरोना संसर्गाने निधन

चोपडा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खानदेशातल्या चोपडा येथील साहित्यिक समीक्षक डॉ. रवींद्र भास्करराव पाटील (प्रा.डॉ आर.बी.पाटील) एक वर्षांपूर्वीच रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. पुन्हा गावी चोपड्यात आले. सध्या ते बालमोहन महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहत होते, ते गावमातीत पुन्हा रमले. निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं जगायचं याचं गणित त्यांनी मांडून ठेवलं होतं. आजन्म प्रामाणिकपणे अध्यापनकार्य केलं त्यामुळे त्यांचे अनेक लेखन प्रकल्प त्यांना पूर्ण करायचे होते. त्याआधीच कोरोना नंतर च्या गुंतागुंतीने त्यांना हिरावून घेतले. जे जे रुग्णालयातून उपचार घेऊन ते गावी आले होते. त्याचा चोपड्यात काल दि २० रोजी कोरोना नंतर हृदयविकाराचा झटक्याने त्याचे निधन झाले आहे.

संघर्षातून त्यांनी शिक्षण घेतले. तसे ते विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते. बी.एस्सी. बी.एड. करून ते माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू देखील झाले होते. पण त्यांच्या घरात साहित्यिक वातावरण होते. मोठे भाऊ बाळकृष्ण सोनवणे आणि लहान भाऊ महेंद्र पाटील हे दोन्ही काव्यलेखन करत होतेच, शिवाय कवी गणेश चौधरी, कादंबरीकार दिवाकर चौधरी यांच्या कुटुंबातील ते एक घटक होते. या वर्तुळात त्यांची समीक्षादृष्टी विकसित झाली. त्यांनी मराठीत एम ए केलं. डॉ.रमेश वरखेडे यांचे ते शिष्य. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्णपदकही त्यांनी मिळाले होते. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'रंगनाथ पठारे यांचे समग्र वाङ्मय' या विषयावर पीएचडी पदवी मिळवली.रयत शिक्षण संस्थेत प्राधापक म्हणून २००० साली रुजू झाले, दरम्यान विविध नियतकालिकांमधून त्यांचे समीक्षालेखन सुरू होते.

भूमिका आणि रुपान्वय हे त्यांचे समीक्षाग्रंथ तर 'तळपाणी' हा कविता संग्रह प्रकाशित आहे.काही कथा व एक लघुकादंबरीही त्यांनी लिहिली आहे. ऑगस्ट २०२० महिन्यात चोपडा येथील अमर संस्था संचालित कला महाविद्यालयाचे (वरिष्ठ )प्राचार्य म्हणून कामकाज सुरू केले होते,विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नवीन नवीन प्रकल्प ते व त्याचे चिरंजीव पूर्वल पाटील घेत होते,त्यात स्पर्धा परीक्षाची तयारी,इंग्रजी स्पिकिंग,विविध काव्य व कथा या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

बातम्या आणखी आहेत...