आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलाचा तुटवडा:नवरात्राेत्सवात तिळाच्या तेलाची मागणी दुप्पट वाढली; आतापर्यंत 30 टनापेक्षा अधिक तेलाची झाली विक्री

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्राेत्सवात देवीच्या प्रतिमेसमोर लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतीसाठी तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. त्यामुळे यंदा वर्षभरातील तेलाच्या विक्रीच्या तुलनेत नवरात्राेत्सवातील तिळाच्या तेलाच्या विक्रीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत जळगावात ३० टन तिळाच्या तेलाची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी अचानक मागणी वाढल्याने बाजारपेठेत दोन तास तेलाचा तुटवडा भासला हाेता.

भारतीय खाद्य संस्कृतीत तिळाच्या तेलाला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे आजही विविध व्यंजने बनवताना आरोग्याच्या दृष्टिकोनातून या तेलाचा वापर करतात.दोन प्रकारचे तिळाचे तेल बाजारपेठेत उपलब्ध दोन प्रकारचे तिळाचे तेल बाजारपेठेत उपलब्ध आहे. यात खाण्यासाठीचे तीळ तेल २०० ते २२५ रुपये किलाे (काही उत्पादकांचे ९०० एमएल) या रेंजमध्ये आहे.

केवळ दिवा लावण्यासाठी व शरीराची मालिश करण्यासाठी वापरले जाणारे अखाद्य तेलाचे दर १३५ ते १५० रुपये या दरम्यान आहेत. नवरात्रीच्या कालावधीत अखाद्य तेलाच्या विक्रीत मोठी वाढ होते. यामध्ये खाण्यासाठी प्रमाण १५ टक्के तर अखाद्य तेलाचे प्रमाण साधारणत: ८५ टक्के एवढे अधिक असते.