आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात सात महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता:अनुदानाची मागणी करणार नाही, असे प्रतिज्ञापत्रावर देणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखा असलेल्या सात महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्वावर अंतिम मान्यता दिली आहे. त्यामध्ये गुलाबराव पाटील यांच्या नावाने सुरू असलेल्या महाविद्यालयाचाही समावेश आहे. या महाविद्यालयांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व वेतनेतर दायित्व शासनावर असणार नाही.

नवीन महाविद्यालय, संस्थांना विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत, असे हमीपत्र 100 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर सादर करावे लागेल. हमीपत्र सादर केल्याशिवाय आणि त्याबाबत विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय विद्यापीठाकडून संलग्नतेची प्रक्रिया सुरु करण्यात येणार नाही. महाविद्यालयाने मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देवू नयेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांची पूर्तता केल्याशिवाय महाविद्यालयांना संलग्नीकरणाची करण्याची कार्यवरही विद्यापीठाकडून करण्यात येणार नाही. या महाविद्यालयांना सक्षम प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत नॅक मूल्यांकन करुन घेण्याचा प्रयत्न करावा. त्याबाबत विद्यापीठाकडून पाठपुरावा करण्यात येईल. संलग्नीकरण, शिखर संस्था, केंद्रीय नियामक मंडळ यांची परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे महाविद्यालय परवानगी देण्यात आलेल्या वर्षात सुरु झाले नाही. त्या शैक्षणिक वर्षाच्या पुढील वर्षात सुरु करणे अनिवार्य आहे.अन्यथा परवानगी अपोआप रद्द होऊ शकते.विद्यापीठाने संलग्नीकरण देण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही करण्यापूर्वी शासन मान्यता आदेशांचे अवलोकन केल्याशिवाय विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करु नये.विद्यापीठाने संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल सहसंचालक उच्च शिक्षण यांना पाठवण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.

या महाविद्यालयांना मान्यता

बळीराजा शिक्षण प्रसारक मंडळ जालनाच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, बहाळ ता.चाळीसगाव,याच शिक्षण मंडळाच्या जामनेर येथील महाविद्यालयालाही याच विद्याखांना मान्यता देण्यात आली. जनसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी महाविद्यालय वेल्हाळे ता.भुसावळ, अंजूमन तालेमुल मुसलमिनचे डॉ.अब्दुल गफ्फार मलिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव कला, विद्यादेवी सरस्वती शैक्षणिक प्रतिष्ठान भाऊसाहेब पी.एच.पाटील महाविद्यालय देवळी ता.जळगाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारित मंडळाचे गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय हारणगाव ता.जळगाव, अमीर प्रतिष्ठानचे अमीर कला व वाणिज्य महाविद्यालय किनगाव ता.जळगाव.

बातम्या आणखी आहेत...