आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज, उद्या ब्लाॅक, 34 गाड्या रद्द:नवजीवनसह सात रेल्वे गाड्या सव्वादाेन तास धावल्या उशिरा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई-अहमदाबाद नवजीवन, लोकमान्य टिळक, लष्कर, काशी, ताप्तीगंगा, रिवा-एकतानगर, भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस या सात गाड्या रविवारी दाेन तासांपेक्षा अधिक वेळ उशिराने धावल्या. गाडी क्रमांक १२६५६ चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस २ तास १५ मिनिटे, १२१६२ लोकमान्य टिळक एक्स्प्रेस २ तास १५ मिनिटे, ०९०७८ भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस २ तास, २०९०६ रिवा-एकतानगर २ तास,१४३१४ बरेली-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस १ तास ५० मिनिटे, गाडी क्र. १५०१८ काशी एक्स्प्रेस ही गाडी अर्धातास, तर गाडी क्र. १९०४६ ताप्तीगंगा एक्स्प्रेस ही गाडी ४५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर गाडी क्र. १९००३ खान्देश एक्स्प्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे. भुसावळ ते जळगाव दरम्यान रेल्वेने ५ व ६ डिसेंबरला ब्लॉक घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...