आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणा प्रवास:शाबाबानगर, आरएमएस कॉलनी; परिसरातील रस्त्याचे भाग्य उजळेना

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशाबाबानगर, आरएमएस कॉलनी, माउलीनगर या परिसरातून जाणारा मुख्य रस्ता कच्चा असून त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. हा संपूर्ण परिसर खोल भागात वसलेला असल्याने पावसाळ्यात अनेक भागात पाणी साचते. तर अनेक भागातील जनजीवनही विस्कळीत होते. त्यामुळे आशाबाबानगर, आरएमएस कॉलनी, माऊलीगनर परिसरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे तरी काम होणे गरजचे आहे.

या मागणीसाठी नागरिकांनी आयुक्त व महापौरांना दिले आहे. आशाबाबा, आरएमएस कॉलनी, माउलीनगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यांअभावी त्रस्त आहेत. आशाबाबानगर खोलगट भागात वसलेले असल्याने पावसाळ्यात येथे अनेक तळे साचून येथील नागरिकांचा शहरातील संपर्कही तुटतो. त्यामुळे या भागात रस्ते करण्याची गरज आहे. यासाठी या नागरिकांनी लोकशाही दिनाचे औचित्य साधून आपल्या भागातील रस्त्यांच्या व इतर असुविधांबद्दल महापौर व आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी बाजीराव ससाणे, विलास पाटील, शैलेश शिरसाठ, सुभाष पाटील, कोमलसिंग पाटील, कांतीलाल पाटील उपस्थित होते.

मुख्य रस्त्याचे काम होणे गरजेचे
माउलीनगर ते आशाबाबानगर या रस्त्याचे काम लवकर होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. पावसाळ्यात या रस्त्याची अधिक दयनीय स्थिती होते. या रस्त्यावरून सतत रहदारी सुरू असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा रस्ता होणे गरजेचे बनले आहे.
- हेमंत खैरनार, आशाबाबानगर

विद्यार्थी, महिलांसह ज्येष्ठांना त्रास
पावसाळ्यात नागरिकांना आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी मुख्य रस्त्यावर यावे लागते. मात्र, आशाबाबानगर, आरएमएस कॉलनी, माउलीनगर हा मुख्य रस्ता देखील विविध समस्यांनी भरला आहे. हा रस्ता संपूर्ण रस्ता कच्चा असल्याने कमीत कमी येथील मुख्य रस्त्याचे तरी काम होणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठांना त्रास होत आहे.
- अभिषेक पालीवाल, आशाबाबानगर

बातम्या आणखी आहेत...