आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील एस.टी. बस स्थानकाशेजारी असलेल्या लक्ष्मी व्यापारी संकुलातील श्री भरकादेवी आईस्क्रीम सेंटरच्या वरच्या मजल्यावर असलेल्या रमेश अग्रवाल यांचे अग्रवाल डायनिंग हॉल हे भोजनालय आगीत जळून खाक झाले.
बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लागलेली ही भीषण अाग शहर पालिकेच्या दोन्ही अग्निशमन बंबांनी सुमारे दोन तास अथक प्रयत्न करून आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या अागीत लाखाेंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या अग्रवाल डायनिंग हॉलमध्ये आग लागल्याचे कळताच बघ्यांनी तत्काळ शहरातील काही सुज्ञ नागरिकांना कळवले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. बंब तत्काळ हजर झाल्याने मोठी हानी टळली. या आगीमुळे शेजारील दुकानांचे व घरांचे नुकसान झाले नाही. आगीचे नेमके कारण समजून आले नाही.
मात्र आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा अंदाज आहे. अागीचे वृत्त कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक माया राजपूत, मुकेश राठोड व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीची काेंडी साेडवली. तसेच गर्दी हटवली. महावितरण अभियंता सुजित पाटील यांनी कर्मचाऱ्यांना बाेलवून वीजपुरवठा खंडित केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.