आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरीरासाठी शहाळे (कच्चे नारळ) अत्यंत उपयुक्त असते. गेल्या आठवड्यात त्याचा भाव ४० रुपये नग असा होता. जळगाव शहरात आठ घाऊक व्यापारी आहेत. मात्र, या आठवड्यात नवीन एक घाऊक व्यापारी या व्यवसायात उतरला. त्याने पहिल्याच महिन्यात दहा गाड्या शहाळे म्हैसूर येथून मागवले.
परिणामी आवक वाढल्याने बाजारात शहाळ्यांचे भाव पाच रुपयांनी कमी झाले. ते आता शहरात ३५ रुपये नग असे मिळत आहेत. शहरात आठ घाऊक व्यापारी शहाळ्याचा व्यवसाय करतात. दिवसाला दोन ते तीन लहान (६५०० ते ७००० शहाळे) तर तीन ते चार मोठ्या (२२००० शहाळे) अशा जवळपास पाच ते सहा गाड्या येतात. बहुतांश शहाळे कर्नाटक राज्यातून मागवले जातात. गेल्या महिन्याभरापासून आणखी एक घाऊक व्यापारी या बाजारपेठेत उतरला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.