आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 प्रांतात एकाच दिवशी शौर्य संचलन:राम मंदिर प्रश्न निकाली निघाल्यानंतर बजरंग दलाचा राष्ट्र सुरक्षासह धर्म प्रसारावर भर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या येथे सन 1992 मध्ये झालेली कारसेवा व गीता जयंती या शौर्य कार्याला उजाळा देण्यासाठी रविवारी शौर्य संचलनाचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल महानगरतर्फे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील चार प्रांतात एकाच दिवशी प्रथमच हे शौर्य संचलन करण्यात आले. तसेच राम मंदिर प्रश्न निकाली निघाल्यानंतर बजरंग दलाचा राष्ट्र सुरक्षा, संस्कार वर्ग, धर्म प्रसारावर भर देण्यात येत असल्याने गेल्या वर्षांपासून ही शौर्य यात्रा काढण्यात येत आहे. या निमित्ताने दुपारी 4 वाजता व. वा. वाचलालयापासून शौर्य यात्रेला सुरुवात करण्यात आली.

6 डिसेंबर 1992 मध्ये गीता जयंतीच्या दिवशी अयोध्या येथे झालेली कारसेवा या शौर्याला उजाळा देण्यासाठी बजरंग दलातर्फे या शौर्ययात्रेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या शौर्ययात्रेला व. वा. वाचनालयापासून सुरुवात होऊन विविध मार्गांनी जात पुन्हा येथेच शौर्य यात्रेची सांगता करण्यात आली. या शौर्य यात्रेत बजरंग दलाचे गणवेशाधारी हाती काठी व भगवा ध्वज तसेच डोक्यावर भगवी टोपी घालून शिस्तीत अग्रभागी येत हे संचलन करण्यात आले. हा शौर्य संचलन मार्ग रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. तसेच मार्गात ठिकठिकाणी फुलांची उधळन करण्यात आली. मार्गात बजरंगदलाचे स्वयंसेवक विविध घोषणा देत होते. या शौर्य यात्रेत विहिंप, बजरंग दलाचे प्रांत, विभाग व जिल्हा पदाधिकारी सहभागी झाले होते.

फुले उधळून, रांगोळ्यांनी शौर्य यात्रेचे स्वागत ...

बजरंग दल महानगरतर्फे रविवारी दुपारी 4 वाजता व. वा. वाचलालयापासून शौर्य यात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गात गणवेशधारी हातात झेंडा, डोक्यावर भगवी टोपी घातलेले स्वयंसेवक सर्वांत पुढे होते. मार्गात ठिकठिकाणी या शौर्ययात्रेवर फुलांची उधळण करण्यात आली. तसेच जागोजागी रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या.

तरुणांनी देशसेवेसाठी पुढे यावे ...

शौर्य यात्रेचा व. वा. वाचनालय येथे समारोप झाल्यानंतर प्रमुख वक्ते देवगिरी प्रांत धर्मप्रसार प्रमुख कृष्णाजी देशमुख तरुणांनी देशसेवेसाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. तसेच भगवद् गीतेमध्ये दिलेले तत्त्वज्ञान तरुण पिढीने आचरणात आणावे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कीर्तनकार शार्दूल महाराज पाटील होते. या वेळी नांदेड येथील बजरंग दलाचे गजानन पांचाळ, विहिंप प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, विभाग संयोजक राकेश लोहार, जिल्हाअध्यक्ष हरीष मुंदडा, उपाध्यक्ष खंडू पवार भूषण क्षत्रीय आदी उपस्तित होते. आकाश फडे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...