आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजन्मापासून मूकबधिर असलेल्या 19 वर्षीय विवाहितेचा तरुणाने मध्यरात्री विनयभंग केला. आपल्यावर झालेला अत्याचार बोलू न शकणाऱ्या या विवाहितेने अखेर इशारे करून पतीला समजावले. यानंतर मोबाइलमध्ये फोटाे दाखवल्यानंतर तिने अत्याचार करणाऱ्या तरुणासही ओळखले. सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकाराचा मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील एका खेडेगावात ही घटना घडली. या गावातील एक दाम्पत्य जन्मापासून मूकबधिर आहे. उन्हाळा असल्यामुुळे दाम्पत्य घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री रोहित अरविंद पाटील हा तरुण छतावर आला. त्याने मूकबधिर असलेल्या या विवाहितेचे तोंड दाबून विनयभंग केला. काही वेळाने तरुण पळून गेला होता. यानंतर विवाहितेने आपल्यावर झालेला अत्याचार पतीस इशारे करून सांगितले. त्याला पत्नीची भाषाही कळाली. सकाळी हे दाम्पत्य पोलिस ठाण्यात गेले. बोलता येत नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करुन त्यांनी आपले म्हणने पोलिसांना पटवून सांगितले. हा प्रकार कोणी केला? याची माहिती पोलिसांना हवी होती. बोलता येत नसल्यामुळे पीडित महिला नाव सांगू शकत नव्हती. अखेर गावातील काही तरुणांच्या मोबाइलमधून तीला फोटो दाखवण्यात आले. यात तीने रोहित पाटील याचा फोटो पाहुन त्यानेच विनयभंग केल्याचा इशारा दिला. त्यानुसार पारोळा पोलिस ठाण्यात रोहितच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार इकबाल शेख तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.