आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन:सीमाप्रश्नी शरद पवारांच्या वक्तव्याला महाराष्ट्राने साथ द्यायला हवी

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे. केंद्रात भाजपची व राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. कर्नाटकातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा निघेल, असे वाटते. आपण मराठी, महाराष्ट्रीयन आहोत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सीमा प्रश्नाबाबतच्या वक्तव्याला महाराष्ट्राने साथ दिली पाहिजे, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील लोक एकत्र येऊ शकतात. मग आपण का नाही? असा सवालही पाटील यांनी केला.गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे बहुमत मिळाले. महाविकास आघाडीने यातून बोध घेण्याची गरज आहे. मनजोडोने जे होते ते कोणत्याही जोडोने होत नाही. ती यात्रा फक्त बघण्यासाठी लोक येतात, असा टोलाही मंत्री पाटील यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल लगावला. निवडणुकीपुरत्या गोष्टी सोडल्या तर एकनाथ खडसेंसारखा ग्रेट नेता नाही, अशी पावतीही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...