आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातील वातावरण:शिंदेंची देहबोली वाटली तणावपूर्ण, जळगावात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुनगंटीवार १६ आमदार अपात्र होणारच नाहीत

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्र ठरणार. सरकार पडणार. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तणावाखाली असल्याचे बुधवारी स्पष्टपणे दिसत होते. सत्तासंघर्षाच्या प्रश्नावर स्मितहास्य करून हात जोडत तुम्हाला शुभेच्छा, असे म्हणत ते चारचाकीत बसून निघून गेले. दरम्यान, शिवसेनेचे १६ आमदार अपात्रच होत नाहीत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आमदार लता सोनवणे यांच्या मुलीच्या विवाह समारंभासाठी मुख्यमंत्री जळगावला आले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी जास्त बोलणे टाळले. आ. सोनवणेंच्या निवासस्थानातून बाहेर पडताना ते तणावात दिसत होते. १६ आमदार अपात्र झाल्यास भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे, असे निदर्शनास आणून दिल्यावर मुनगंटीवार म्हणाले, ‘सत्तासंघर्ष असता तर आम्ही या कार्यक्रमाला दिसलो असतो का? उद्या सत्याचाच विजय होईल. आम्ही या पुढेही सत्तेवर राहू.’ खासदार संजय राऊत यांचा सरकार पडण्याचा दावा म्हणजे मुंगेरीलालचे स्वप्न आहे, असे ते म्हणाले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना राऊत जागेपणी स्वप्न बघत आहेत, अशी टीका केली.