आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे सरकार ज्यांच्यामुळे धाेक्यात आले ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे ४५ पेक्षा अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीत मुक्कामाला आहेत. या घडामोंडीमुळे संपूर्ण देशात कोण हे एकनाथ शिंदे याविषयी उत्सुकता असून लोक गुगलाच हा प्रश्न विचारत आहेत. या घडामोडी महाराष्ट्राशी संबंधित असल्याने उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या तुलनेत देशात शिंदेंचा सर्च ट्रेंड ६४ टक्के आहे. तर शिंदेंनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिल्याने पाकिस्तान आणि सौदी या मुस्लिम देशांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेंविषयी माहिती सर्च केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेले गुवाहाटी शहर मुंबईपासून २७०० किमी दूर आहे. या ठिकाणी ४० आमदारांसह एकनाथ शिंदे थांबले आहेत. त्यामुळे ईशान्येतील आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेशसह शेजारच्या पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण चर्चेत आहे. यातही एकनाथ शिंदेंविषयी अधिक माहिती नसल्याने लोक गेल्या तीन दिवसांमध्ये गुगलवर त्यांच्याविषयी माहिती, फाेटाे, बातम्या सर्च करीत आहेत. देशभरात शिंदेंचा तीन दिवसांतील सर्च ट्रेंड ६४ टक्के एवढा राहिलाआहे. ही संख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे.
असा राहिला ट्रेंड
२१ जून रोजी दुपारी २.३० वाजता शिंदेंचा ट्रेंड टाॅपवर होता. २२ जून राेजी ते सुरतहून गुवाहाटीला गेल्यानंतर हा ट्रेंड आणखी वाढला. तर २२ जून राेजी दुपारी १२.३० वाजेपासून उद्धव ठाकरेंचा ट्रेंड सुरू होता. बुधवारी पत्रकार परिषदेनंतर रात्री १०.३० वाजता ठाकरे सर्च ट्रेंडमध्ये एकनाथ शिंदेंच्या पुढे होते.
३३ देशांमध्ये ट्रेंड
जगभरातील ३३ देशांमध्ये ३ दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे होते. शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानात ५४ टक्के, सौदी अरेबियात ५७ टक्के, मलेशिया ६१ टक्के, नेपाळ ५१ टक्के, बांगलादेश ४२ टक्के, थायलंड ५४ टक्के, जपान ५९ टक्के, कॅनडात ५५ टक्के लोकांनी सर्च केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.