आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाने दिले हाेते आदेश:शिवछत्रपती पुरस्कार फसवणूक; डाॅ. प्रदीप तळवेलकरांवर गुन्हा

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कारासाठी बनावट सहभाग प्रमाणपत्र सादर करून पुरस्कार मिळवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशांवरुन माजी क्रीडा शिक्षक डाॅ. प्रदीप तळवेलकर यांच्यावर साेमवारी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाॅ. तळवेलकर यांच्यासह आठ जणांविरुद्ध फारुक शेख अब्दुल्ला यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीवरून जळगाव सत्र न्यायालयाने ११ नोव्हेंबर २२ रोजी याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले हाेते.

त्यानुसार ला. ना. हायस्कूलचे माजी क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप तळवेलकर यांच्यासह ला.ना. शाळेतील क्रीडा शिक्षक प्रशांत राजाराम जगताप, आसिफखान अजमल खान (रा. गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज), प्राचार्य बी. पी. खिवसरा (रा. धंतोली, नागपूर), निवृत्त क्रीडा शिक्षक अशोक दुधारे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक, नाशिक), क्रीडा संचालक तथा क्रीडा संघटक डॉ. उदय डोंगरे (औरंगाबाद), प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील (शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपूर), सॉफ्टबॉल असोसिएशन इंडियाचे सचिव डॉ. एल.आर. मोर्य (इंदूर) यांच्यावर साेमवारी रात्री गुन्हा नोंद झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास पवार हे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...