आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:खडके विद्यालयात शिवगंध रंगला‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक‎ विद्यालयात वार्षिक पारितोषिक‎ वितरण समारंभ शिवगंध नुकताच‎ घेण्यात आला. या निमित्ताने‎ साहित्यिक अॅड. विलास मोरे यांनी‎ विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या जीवन चरित्राबाबत‎ मार्गदर्शन केले. या निमित्ताने पीयूष‎ कोल्हे यांनी विद्यार्थ्यांनी तयार‎ केलेल्या शिवप्रताप या‎ हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात‎ आले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक‎ संजय पाटील यांनी केले. या‎ निमित्ताने शाळेत विविध स्पर्धांमध्ये‎ यशस्वी झालेल्या विजेत्यांचा गौरव‎ करण्यात आला. तसेच‎ शिवचरित्रावर आधारित‎ शिवरायांचा पाळणा, गोंधळ,‎ अफजल खान वध, पोवाडा, माय‎ भवानी, राज्याभिषेक सोहळा हे‎ कार्यक्रम सादर केले. पूनम पाटील‎ यांनी सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...