आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:गैरवर्तनप्रकरणी शिवसेनेची महावितरणच्या एजीएमशी चर्चा ; शिवसेना स्टाईल हिसका दाखवण्याचा इशारा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण व्यवस्थापकाचे कर्मचारी महिलेशी गैरवर्तनप्रकरणी न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईल हिसका दाखवण्याचा इशारा शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी १.३० वाजता एमआयडीसीतील महावितरण कार्यालयात दिला. पीडित महिलेसह शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या एजीएम व विशाखा समितीशी याबाबत चर्चा केल्याचे शिवसेनेच्या सरिता माळी यांनी सांगितले. महावितरण कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी व्यवस्थापक उद्धव कडवे यांने गैरवर्तन केल्याची तक्रार पीडितेने महावितरणच्या कोकण प्रादेशिक सहव्यवस्थापकांकडे केली होती. तर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील २४ मे रोजी व्यवस्थापक कडवेवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते; मात्र याबाबत कारवाई झालेली नसल्याने बुधवारी शिवसेनच्या पदाधिकारी एमआयडीसीच्या महावितरण कार्यालयात पीडितेसह गेल्या होतो.

बातम्या आणखी आहेत...