आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना व शिंदे सेनेतील राजकीय वाद वाढतच चालला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता थेट पूर्वी दिलेल्या साधनसामग्री काढून घेण्याचे प्रकार सुरू आहे. शिंदे गटाने शुक्रवारी रुग्णवाहिका परत घेतल्यानंतर शिवसेनेकडून तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली. येत्या २७ जुलैला ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लाेकार्पण केले जाणार आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वत्र केवळ शिवसेना आणि शिंदे सेनेचीच चर्चा सुरू आहे. दररोज या गटातून त्या गटात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वर्षभरापूर्वी शिवसेना महानगराला देण्यात आलेली रुग्णवाहिका आमदार पाटील यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी मागवून घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, जळगावातील रुग्णांना शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवेत खंड पडू नये म्हणून शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था उभारली आहे.
सेना कार्यालयात कार्यक्रम
येत्या २७ जुलै रोजी शिवसेना कार्यालयाच्या परिसरात शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लाेकार्पण केले जाणार आहे. यावेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन यांची उपस्थिती राहणार आहेत असे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.