आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:धरणगावमध्ये शिवसेना-शिंदे गटाच्या दोन ‘गुलाबरावा’त आता हाेणार संघर्ष

जळगाव/धरणगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची चिंता वाढवणाऱ्या घडामोडी राजकारणात घडत आहेत. शिवसेनेकडून त्यांना पर्याय शोधण्यात येत आहे. गुलाब गेला तरी झाड माझ्याकडे आहे. ते कसे फुलवायचे, हे शिवसेनेला माहीत आहे. एक गेला तरी दुसरा काटेरी गुलाब शिवसेनेकडे असल्याचे विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना संघटनेच्या कामाला लागा असा सूचक इशारा त्यांनी दिला. त्यामुळे धरणगाव मतदारसंघात िशंदे गटाचे गुलाबराव पाटील विरुद्ध शिवसेनेचे गुलाबराव वाघ यांच्यात संघर्ष बघायला मिळणार आहे.

जिल्हाप्रमुख वाघ यांनी बुधवारी मातोश्रीवर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंना समर्थन देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांसह त्यांनी भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार वाघ यांच्यासह कार्यकर्ते मातोश्रीवर गेले होते. अॅड. शरद माळी, राजंेद्र ठाकरे, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक सोनवणेंसह जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नेते गेले, कार्यकर्ते सोबत
शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल ठाकरे यांनी वाघ यांचे कौतुक केले. त्याचबरोबर शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला. कार्यकर्त्यांच्या भरवशावर नेते निवडून येतात. पुढे ते मोठे बनतात. नेते सोडून गेले असले तरी कार्यकर्ते सोबत असल्याचे विधान त्यांनी केले. काटेरी गुलाब असा उल्लेख जिल्हा प्रमुख वाघ यांना उद्देशून केला.

भाजपने गुलाब पाहिला, आता काटे दिसतील
भाजपने ‘गुलाब’ पाहिला, आता काटेदेखील दिसतील.आपण सर्वांनी प्रेमाने, मायेने निष्ठेने दूध पाजलं, पण औलाद गद्दारच राहिली. नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच,अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडले.

धरणगाव मतदारसंघात माळी, गुजर समाज अधिक
धरणगाव मतदारसंघात ५० हजाराच्या जवळपास माळी त्या खालोखाल गुजर समाजाचे मतदान आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुजर समाजाचे आहेत. वाघ हे माळी समाजाचे आहेत. नव्वदच्या दशकात सेनेतर्फे माळी समाजाचे हरिभाऊ महाजन यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांच्या विरुध्द माळी समाजाचे राष्ट्रवादीचे उमेदवार ज्ञानेश्वर महाजन हे पराभूत झाले होते.

बातम्या आणखी आहेत...