आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:वावडदा विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेच्या नम्रता पॅनलचा विजय, विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली

शिरसोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वावडदा (ता. जळगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक रविवारी झाली. रवींद्र कापडणे यांच्या नम्रता पॅनल व सरपंच राजेश वाडेकर यांच्या शेतकरी राजा विकास पॅनल यांच्यात लढत झ‌ाली. यात नम्रता पॅनलचा विजय झाला असून, त्यांचे १३ उमेदवार निवडून आहे.

निवडणुकीत निवडून आलेल्या नम्रता पॅनलचे विजयी उमेदवार कंसात त्यांना मिळालेली मते आहे. जनरल मतदारसंघ : अनिल बारसू भोळे (२४८), मिश्रिलाल प्रेमा राठोड (२४७), मोतीलाल माधव पाटील (२४६), पोपट फकिरा पाटील (२४२), सुधाकर ओंकार येवले (२३८), संजय रतन पाटील (२३५), देविदास जालम वंजारी (२३१), हरी पेलाद वंजारी (२२७), महिला राखीव मतदारसंघ : सुमनबाई कौतिक पवार (२४५), शशिकला प्रकाश पाटील (२३१), इतर मागासवर्गीय मतदारसंघ : सुरेश विक्रम पाटील (२४२), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ : अनिल राजू गवळे (२२१), वि‌जाभज व विमाप्र : पुरून गणपत वंजारी (२४४) हे १३ उमेदवार विजयी झाले. निवडणुकीत शिवसेना प्रणीत रवींद्र कापडणे यांच्या नम्रता पॅनलने सरपंच राजेश वाडेकर यांच्या शेतकरी राजा पॅनलचा पराभव केला. दरम्यान, निवडणुकीत सरपंच वाडेकर व रामदेववाडी सरपंच शांताबाई चव्हाण या दोन विद्यमान सरपंचांचा पराभव झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...