आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे गेल्या दाेन वर्षांपासून गणेशोत्सव, दहीहंडीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यंदा शासनाने सर्व निर्बंध हटवल्याने उत्सव दणक्यात साजरे करण्याची जाेरदार तयारी सुरू झाली आहे. १९ आॅगस्टला दहीहंडी तर ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन हाेत आहे. त्या दिवशी १५० ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडीचा उत्सव, बाप्पांचे दणक्यात स्वागत करण्याची तयारी ‘शिव तांडव’च्या कला पथकाने सुरू केली आहे. गेल्या महिनाभरापासून पथकाने खान्देश सेंट्रलच्या परिसरात जाेरदार सराव केला जात आहे.
शाळा, महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. तसेच सण-उत्सव साजरे करण्यासाठी यंदा परवानगी मिळाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडीत ढोलचा गजर करण्यासाठी ‘शिव तांडव’च्या १५० तरुणांचे पथक सज्ज झाले आहे. शिव तांडव पथकाच्या सरावात महिनाभरात वाद्यांवर सुमारे ९० हजार रुपयांचा खर्च होता. दीड ते दहा दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी हे पथक ढोल, ताशांचा गजर करीत मंडळांना आपली कलाकुसर दाखवतात. त्या पोटी मिळालेल्या पैशांचा त्यांचा दोन लाखांचा बजेट असताे. हेच पैसे पुन्हा पुढच्या वर्षी वाद्यावर खर्च हाेतात.
२५ तरुणींचा आहे सहभाग
ढोल पथकावर केवळ तरुणांचा मक्ता नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून या ढोल पथकात २५ महाविद्यालयीन तरुणींचाही सहभाग आहे. अभ्यासासह इतर छंद जोपासण्यासाठी या तरुणींनी ढोल वाजवण्यास पसंती दिली आहे.
उच्चशिक्षितांनी दिली पसंती
‘शिव तांडव’ पथकात शहरातील सुमारे १५० सदस्य आहेत. त्यात व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, उच्चशिक्षित विद्यार्थी, तरुणींचा समावेश आहे. छंद जोपासण्यासाठी तरुणाई ढोल पथकात सामील झाली आहे. सागर कापुरे, कल्पेश शेटे, हर्षदा पाटील, वैष्णवी पाटील आदींनी हे पथक तयार केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.