आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील धक्कादायक घटना:आत्महत्येचा बनाव करत व्यसनी पतीने केला पत्नीचा खून, चारित्र्यावर घ्यायचा सतत संशय

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्यावर संशय तसेच मुलबाळ होत नसल्यामुळे एका व्यसनी पतीने पत्नीचा गळा आवळुन खून केला. अमळनेरच्या मुंबई गल्लीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली होती. पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करत त्याने पोलिसात नोंद केली. दरम्यान, पोलिसांना संशय बळावल्यानंतर त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी योगीता हिचा खुन केला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हीचा विवाह अमळनेर येथील देविदास चौधरी याच्याशी झाला होता. बचत गट वाले कर्जाचे पैसे मागणीसाठी तगादा लावत होते, त्यामुळे 8 सप्टेंबर रोजी योगीताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनव पती देविदासने केला. अगदी पोलिसात खबर देतांना त्याने आत्महत्यानंतर ती खाली पडल्याचेही नमूद केले.

गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा

परंतू मृत योगीताचा भाऊ दिनेश चौधरी व इतरांनी प्रत्यक्ष पाहिले असता योगीताच्या गळ्यावर सर्व बाजूने दोरी आवळल्याचे व्रण होते. तसेच गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा होत्या आणि तिच्या नाकातून देखील रक्त बाहेर आलेले होते. धक्कादायक म्हणजे वर छताला कुठेच दोरी लटकलेली अथवा तुटलेली दिसली नाही, की ज्यामुळे योगीताचे प्रेत खाली पडल्यीचे सिद्ध झाले नाही.

पोलिसी खाक्या

त्याने पोलिसांकडे देखील संशय व्यक्त केला. त्यानुसार पाेलिसांनी चौकशी केली. योगिता वरून खाली पडून आली असे सांगितले जात होते मात्र वरून पडल्याने लागलेल्या काहीच जखमा अथवा चिन्हे दिसली नाहीत. त्यामुळे योगीताचा खून झाल्याची खात्री भाऊ दिनेशला झाल्याने त्याने रात्री उशिरा अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सुर्यकांतला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय

यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी योगीताला मुलबाळ होत नव्हते. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. सुर्यकांतचे व्यसन वाढत असल्यामुळे पैशांची चणचण असायची, अशात तो पत्नी योगीताकडे पैसे मागत राहायचा. यातून वाद होत असल्यामुळे त्याने पत्नीचा खुन केला. अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...