आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनचा काळाबाजार:लाभार्थ्यांना डावलून दुकानदाराकडून परस्पर चढ्या दराने विक्री, कारवाईत 2.5 लाखांचे धान्य जप्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गरीबांसाठी अत्यल्प दरात शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या रेशनच्या धान्याची परस्पर बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकावर मंगळवारी पुरवठा विभागाने कारवाई केली. या व्यक्तीकडून २ लाख ४८ हजार ५०० रुपयांचे स्वस्त धान्य जप्त करण्यात आले आहे.

मेहमुद बिसमिल्ला पटेल याच्यावर स्वस्त धान्याची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पटेल हा आपल्या घराबाहेरच दोन वाहनांतून ९० क्विंटल तांदूळ व १५ क्विंटल गहु विक्री करीत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली. त्यानुसार तहसिल कार्यालयाचे पुरवठा तपासणी अधिकारी दिगंबर जाधव यांनी पथकासह घटनास्थळी जात तपासणी केली. तेव्हा हे धान्य राशनचे असल्याची खात्री झाली. त्यानुसार पथकाने पंचनामा करुन हे धान्य जप्त केले.

जळगाव जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानादारांकडून लाभार्थ्यांना पुरेसे, वेळेत धान्य दिले जात नाही. दुसरीकडे या धान्याची ज्यादा दराने व्यवसायिक विक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पटेल याच्याकडील धान्याबाबतही तक्रार केली गेली होती. पथकाने वेळीच तपासणी केल्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पटेलच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...