आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या फोटोसह युवकाने सोशल मीडियावर मजकूर पोस्ट केला होता. त्या युवकाची चौकशी होवून गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याच्या संशयावरून मंगळवारी रात्री यावल पोलिस ठाण्यासमोर जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी दहा जणांविरुध्द दंग्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नेमके प्रकरण काय?
प्रवीण तेली या युवकाने मोबाईलवर नुपूर शर्मा यांचा फोटो ठेवून मजकूर पोस्ट केला होता. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अजहर शेख समसोद्दिन यांनी सात ते आठ नागरिकांसह पोलिसांना निवेदन दिले. त्याची चौकशी होवून गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा न करता अजहर याच्यासह दहा जणांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस कॉन्स्टेबल गणेश ढाकणे यांच्या तक्रारीवरुन दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली भेट
दहा जणांविरुध्द गुन्हा
तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, सहाय्यक पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल घोषणाबाजी करणाऱ्या फैजान शहा गफार शहा, अशफाक शहा, गफार शहा, असलम मुन्शी मोमीन, अजहर शेख समसोद्दीन, अजहर खाटीक, जमील लकडीवाला, दानिश सोनू पटेल, अरबाज रज्जाक पटेल, तनवीर गुलाब पटेल व समीर बादल पटेल सर्व रा.यावल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.