आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड कृषी महोत्सवावरही बहिष्कार:सत्तारांविरोधात राज्यातील 125 कृषी उपसंचालकांचे सामूहिक रजा अस्त्र; पदोन्नतीची फाईल अडल्याने निर्णय

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी राज्यातील कृषी विभागांकडून घेतलेल्या देणगीचा विषय विधीमंडळात उपस्थित झाल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले. या प्रकरणात सारवासारव झाल्यानंतर आता पदोन्नतीची फाईल अडल्याने संतप्त झालेल्या राज्यातील 125 कृषी उपसंचालकांनी कृषी महोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी सोमवारपासून सामुहिक रजा अस्त्र कृषी मंत्र्यांच्या विरोधात वापरले आहे.

राज्याच्या कृषी विभागाने 30 डिसेंबर रोजी केवळ दोन कृषी उपसंचालकांना सेवानिवृत्तीच्या एक दिवसापूर्वी पदोन्नती देवून चेष्टा केली. त्याचा कृषी सेवा वर्ग 1 अधिकारी संघटनेने निषेध केला आहे. पदोन्नतीस पात्र इतर कृषी उपसंचालकांना 31 डिसेंबरपर्यंत पदोन्नतीचे आदेश कृषी विभागाने न दिल्याने राज्यातील कृषी उपसंचालक संतप्त झालेले आहेत. कृषी उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गात पदोन्नतीचे आदेश 31 डिसेंबरपर्यंत मिळण्याची मागणी कृषी सेवा वर्ग 1 अधिकारी कल्याणकारी संघटनेने कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे 12 डिसेंबर रोजी केली होती. ज्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झालेली आहे.

परंतु, शासनाच्या दिरंगाईमुळे आदेश दिलेले नाहीत. त्या अधिकाऱ्यांच्या नावाचाही पदोन्नतीच्या यादीत समावेश करण्यात यावा. महसूल विभागाचा विकल्प देणाऱ्या व सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या अधिकाऱ्याला महसूल विभागात पदोन्नती देण्यात यावी, यासह इतर मागण्या कृषी सेवा वर्ग 1 अधिकारी संघटनेने केलेल्या होत्या.

नोव्हेंबरपर्यंतच होती पदोन्नती अपेक्षित

सन 2012 पासून कृषी उपसंचालकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया झालेली नाही. किमान चार वर्षांपूर्वीच कृषी उपसंचालकांना पदोन्नती मिळणे अपेक्षित होते. अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री झाल्यानंतर ही पदोन्नतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. तीन महिन्यांपासून कृषी उपसंचालकांच्या पदोन्नतीची फाईल कृषीमंत्री सत्तार यांच्याकडे होती. नोव्हंेबरपर्यंतच कृषी उपसंचालकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. डिसेंबर महिन्यानंतरही पदोन्नती देण्यात आली नाही. आता ती फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेली आहे.

पदाेन्नतीला विलंब झाल्याने सामुहिक रजा

कृषी सेवा वर्गचे अधिकारी कल्याणकारी संघटनेचे ​अध्यक्ष आरिफ शाह म्हणोल की, राज्याच्या कृषी विभागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गातील 84 पदे रिक्त आहेत. 60 टक्के पदांचा अतिरिक्त पदभार आहे. वर्धा व पुणे जिल्हा वगळता आत्मा प्रकल्प संचालकपद प्रभारी आहे. राज्यातील कृषी उपसंचालकांची पदोन्नती चार वर्षांपूर्वीच होणे आवश्यक होते. विलंब होत असल्याचे 31 डिसेंबरपर्यंत पदोन्नती न झाल्यास सामुहिक रजेवर जाण्याचा प्रधान सचिवांना इशारा दिला होता .त्यामुळे सोमवारपासून राज्यातील 125 कृषी उपसंचालक कृषी महोत्सवावर बहिष्कार टाकून सामुहिक रजेवर गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...