आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यात तीन हजारांची वाढ:साेने 60 हजारांवर, चांदी प्रति किलो 68,800; तेजी राहणार

जळगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय आर्थिक जगतात हाेणाऱ्या घडामाेडींनी साेने व चांदीच्या दरात गेल्या दाेन दिवसांत तेजी आली. शनिवारी साेने ६० हजार रुपये प्रतिताेळा तर चांदी ६८,८०० प्रतिकिलाेवर पाेहोचली. येत्या आठवड्यात ही तेजी कायम राहून साेन्याचे दर ६३ हजारांवर तर चांदी ७५ हजारांपर्यंत पाेहोचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात तीन हजारांची वाढ नाेंदवली गेली. जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी साेन्याचे प्रतिताेळ्याचे दर ५८,८०० तर चांदीचा प्रतिकिलाेचा दर ६७,५०० हाेता. एकाच दिवसात साेने १२०० रुपयांनी वाढून ६० हजार झाले. चांदीच्या दरातही १३०० रुपयांची वाढ हाेऊन ते ६८,८०० रुपयांवर पाेहाेचले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामाेडींमुळे साेने व चांदीच्या दरात निरंतर तेजी राहण्याचा अंदाज आहे. चार दिवसांपूर्वी साेन्याचे दर ६० हजारांवर पाेहोचण्याचा अंदाज वर्तवला हाेता. येत्या आठवड्यात साेन्याचे दर ६२ ते ६३ हजार रुपये ताेळ्यावर पाेहाेचतील. चांदीचे दर ७२ ते ७५ हजार रुपये किलाेवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जळगाव शहर सराफ असाेसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...