आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:किलोभर पेढ्यांपेक्षाही कमी किमतीमध्ये गणपतीसाठी चांदीच्या दूर्वा, मोदक आणि फूल; 300 किलोची मागणी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायाला भक्तिभावाने चांदीच्या दूर्वा आणि चांदीचे जास्वंदाचे फूल अर्पण करायची इच्छा असेल तर किलोभर पेढ्यांच्या किमतीपेक्षाही कमी किमतीत ती इच्छा पूर्ण करता येऊ शकते. गेल्या १५ दिवसांत चांदीच्या किमतीत आठ हजार रुपयांनी घट झाल्याने या वस्तू सर्वसामान्यांच्या आणखीच आवाक्यात आल्या आहेत.

जळगाव शहराला सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. इथले सोन्याचे दागिने सर्वत्र प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवात सोन्यापासून बनवलेले मोदक, दूर्वा आणि फूलही इथे मिळते; पण त्याच्या किमती तुलनेने जास्त आहेत. चांदीच्या वस्तूही आपल्याला परवडणार नाहीत, असा बऱ्याच जणांचा समज असतो. वस्तुस्थिती मात्र वेगळी असून त्यापेक्षा पेढे व माव्याच्या किलोभर मोदकांची किंमत जास्त आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही यंदा चांदीचा मुकुट, छत्री, सोंड, कान यांचे कव्हर यांची मागणी वाढली असून किमान तीन क्विंटल चांदीचे असे दागिने विकले गेले आहेत.

२२५ रुपयांत फूल, १७५ मध्ये माेदक या चांदीच्या वस्तू एक ग्रॅमपासून ते ४० ग्रॅमपर्यंत उपलब्ध आहेत. १० दूर्वांची १०० मिलिग्रॅम वजनाची जुडी २३० रुपयांत येते. या दूर्वांची माळदेखील मिळते. जास्वंदाचे ३ ग्रॅम वजनाचे फूल २२५ रुपयांपासून मिळते. सध्या एक किलो पेढ्यांचा दर किलोला ४८० रुपये व माव्याचे मोदक किलोला ५२० रुपये दराने मिळतात.

अशा मिळतात वस्तू चांदीपासून बनवलेल्या दूर्वा, विड्याचे पान, सुपारी, माेदक, उंदीर आणि जास्वंदाचे फूल, हार या वस्तू जळगावात उपलब्ध असतात. मोदक एक नगापासून वेगवेगळ्या संख्येत राशींसह उपलब्ध आहेत. यात पसंती जास्वंदाच्या फुलाला असते. फुलाला दिला जाणारा लाल रंग आणि त्यावरील कारागिरीमुळे ते माेदक आणि दूर्वांपेक्षा अधिक आकर्षक दिसते.

साेन्या-चांदीच्या प्रमुख वस्तूंचे दर वस्तू (साेने/ चांदी) वजन किंमत जास्वंदाचे फूल (साेने) १ ग्रॅम ५३०० जास्वंदाचे फूल (चांदी) १ ग्रॅम २२५ १० दूर्वांची जुडी ( साेने) १०० मिलिग्रॅम ५३०० १० दूर्वांची जुडी (चांदी) १०० मिलिग्रॅम २३० माेदक (साेने) १ ग्रॅम ५२०० माेदक (चांदी) १ ग्रॅम १७५

बातम्या आणखी आहेत...