आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनाथांची आई सिंधूताई सपकाळ यांनी मांडलेल्या विचारांवरच आपले जीवन कार्य सुरू आहे. त्यांचे विचार हे जीवनाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन विशाखा शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष विशाखा शिंदे यांनी केले. भुसावळ येथील गडकरी नगरात आयाेजित केलेल्या कार्यक्रमात त्या बाेलत हाेत्या. इंदू बागले, नंदा वानखेडे, सरला बडगे, अॅड.आशा बनसाेडे यांच्यासह परिसरातील अनेक महिला, शाळेतील शिक्षिका, पालक कार्यक्रमास उपस्थित हाेते. सिंधूताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक आशा बनसाेडे यांनी तर सूत्रसंचालन विशाखा शिंदे यांनी केले. सिंधूताई सपकाळ यांनी त्यांचे जीवन हे सर्व समाजासाठी वाहून घेतले हाेते. समाजातील गाेरगरीबांसाठी त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत कार्य केले. आपण त्यांच्याइतके तरी काही करू शकत नाही, मात्र आपल्या परीने जितके चांगले काम समाजासाठी करता येईल तेवढे करावे, असे सांगून आलेल्या संकटावर खंबीरपणे मात करून जीवनाची वाटचाल चालत राहावी, असे आवाहन देखील कार्यक्रमात करण्यात आले.
जळगावच्या लाठी शिशुगृहाला २५ हजारांची मदत
जळगाव येथील आनंद लाठी शिशुगृह या संस्थेला सिंधूताई सपकाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशाखा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेतर्फे २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्याबद्दल संस्थेने त्यांचे आभार मानले. दरम्यान, अनाथ मुलांना मदत करण्याचा मानस असल्याने कार्यक्रमाचे आैचित्य साधून मुलांसाठी ही मदत दिली, असे विशाखा शिंदे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.